गहुंजे परिसरात अपहरण करून लूट; सहा जणांना अटक पिंपरी-चिंचवड : गहुंजे स्टेडियम परिसरात


गहुंजे परिसरात अपहरण करून लूट; सहा जणांना अटक
पिंपरी-चिंचवड : गहुंजे स्टेडियम परिसरात

मोटारसायकलस्वाराचे अपहरण करून त्याच्याकडील वस्तू लुटल्याच्या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींचा सहभाग समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रिक्षा आणि मोबाईल असा सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, आरोपींनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!