शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो सेवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता


शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो सेवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता

पुणे : पुणेकर आणि हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या मार्गावर मेट्रो सेवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा मोठा फायदा होणार आहे. सेवा सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रवासाचा वेळही वाचण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!