पुण्यात अनेक भागांत २७ ऑगस्टला पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन


पुण्यात अनेक भागांत २७ ऑगस्टला पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पार्वती, लोहगाव, विमाननगर, कोथरूड, बावधन, कर्वेनगर यासह शहरातील अनेक भागांना या पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मध्यवर्ती पेठ परिसरातील पाणीपुरवठा नियमित राहणार असल्याची माहिती आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!