नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार


नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार

नागपूर : वाठोडा परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र घराच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलीस फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!