नाशिक: साप अन् खेकड्यांच्या गढूळ पाण्यात ७५ वर्षीय आजींची दोन दिवस मृत्यूशी झुंज; चांदवड येथील घटना


​नाशिक: साप अन् खेकड्यांच्या गढूळ पाण्यात ७५ वर्षीय आजींची दोन दिवस मृत्यूशी झुंज; चांदवड येथील घटना


नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेने दाखवलेल्या अफाट धैर्याची आणि जिद्दीची घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ७५ वर्षीय चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या वृद्धा बसस्थानकाजवळील एका उघड्या विहिरीत पडल्या होत्या. तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याशिवाय अंधाऱ्या विहिरीत मृत्यूच्या दाढेत अडकूनही त्यांनी स्वतःचा जीव वाचवला असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
​२९ ऑगस्टपासून चंद्रभागा आजी बेपत्ता होत्या. परिसरात शोध घेऊनही त्या मिळून येत नव्हत्या. दरम्यान, त्या बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. विहिरीत साप आणि खेकड्यांचा वावर असतानाही कोणत्याही अन्नाविना किंवा पाण्याविना त्या अंधारमय विहिरीत टिकून राहिल्या. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने त्यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, ७५ व्या वर्षी त्यांनी मृत्यूवर मिळवलेल्या या विजयाने सर्वत्र आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केले जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!