चार नव्या प्लॅटफॉर्ममुळे लोकल फेऱ्या वाढणार
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन अंधेरी, बोरीवली आणि विरार स्थानकांचा विस्तार करण्यात येत आहे. या तिन्ही स्थानकांवर चार नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम सुरू आहे.
नवीन प्लॅटफॉर्ममुळे स्थानकांची लोकल हाताळण्याची क्षमता वाढणार असून, अंधेरी ते विरारदरम्यान दररोज ३० ते ४० अतिरिक्त लोकल फेऱ्या चालविणे शक्य होईल. त्यामुळे प्रवासी गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
Views: 46







