पुणे-दादर शिवनेरीचे व्हॉट्सअॅपवरून तिकीट बुकिंग सुरू
पुणे : पुणे-दादर मार्गावरील शिवनेरी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने नवी सुविधा सुरू केली आहे. २४ सप्टेंबरपासून व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट बुकिंग सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.
या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. प्रवाशांनी ८०९७०३००२२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर फक्त ‘Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर पुढील प्रक्रियेद्वारे बसल्या जागेवरून शिवनेरीचे तिकीट बुक करता येणार आहे.
पुणे-दादर मार्गावरील वातानुकूलित शिवनेरी बसचे तिकीट ५९० रुपये आहे. डिजिटल सुविधेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
Views: 70





