ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन; हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा


ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन; हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा

मुंबई : ‘वेलकम’, ‘गदर’ आणि ‘आशिकी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन झाले. गेल्या पाच वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी धैर्याने झुंज देत होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मुश्ताक खान यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक परिचित आणि गुणी चेहरा हरपला आहे. त्यांच्या विविधांगी भूमिका आणि अभिनयाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!