जळगावात ५० हून अधिक ढोल धारदार शस्त्राने फाडले; विसर्जन मिरवणुकीआधी पथकाचे मोठे नुकसान
जळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काही तास आधी खानदेश सेंट्रल मॉल परिसरात अज्ञात समाजकंटकांनी एका नामांकित ढोल पथकाचे ५० हून अधिक ढोल धारदार शस्त्राने फाडल्याची घटना घडली. यामुळे पथकाचे मोठे नुकसान झाले आहे.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत १०१ ढोल एकत्र वाजवण्याचा संकल्प करून हे पथक गेल्या तीन महिन्यांपासून सराव करत होते. मात्र, मिरवणुकीपूर्वीच घडलेल्या या प्रकारामुळे तरुणांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
Views: 61





