सापडलेली दोन तोळ्याची साखळी विद्यार्थ्याने केली परत..

टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपुर तालुक्यातील खोकर येथे खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणार्या हर्षद ज्ञानदेव बर्डे या विद्यार्थ्याने विद्यालयाच्या प्रांगणात सापडलेली तीन लाख रुपये किंमतीची दोन तोळे सोन्याची साखळी परत करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
विद्यालयातील एका कर्मचार्याची दोन तोळे सोन्याची साखळी शनिवार दिनांक २६ रोजी शोळेचे कामकाज करत आसताना शाळेच्या आवारातच पडली.दरम्यान शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना इयत्ता आठवीतील हर्षद बर्डे याला ती सापडली.मात्र बाजारातील वापरायची साखळी समजुन तो ती साखळी घरी घेऊन गेला.घरी जाऊन आजीला व वडीलांना ती साखळी त्याने दाखवल्यानंतर सदर साखळी सोन्याची असल्याचे बर्डे कुटुंबियांच्या निदर्शनास आले.मोलमजुरी करुन पोट भरणार्या बर्डे कुटुंबियाने ही सोन्याची साखळी शाळेत जाऊन परत करण्याचा निर्णय घेतला.दुसर्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने सोमवारी शाळा भरल्यानंतर हर्षदचे वडील ज्ञानदेव बर्डे,चुलते नंदु बर्डे व आजी आशाबाई बर्डे यांनी स्वतः शाळेत येऊन सदर सोन्याची साखळी मुख्याध्यापकांकडे परत केली.मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी ज्या कर्मचार्याची ही साखळी हरवली होती ती संपुर्ण खात्री करुन परत त्यांच्या स्वाधीन केली.कर्मचार्यानेही आपली दोन तोळ्याची साखळी पुन्हा मिळाल्याने बक्षीस म्हणुन हर्षद बर्डे याला सायकल भेट दिली.शाळेच्या वतीने हर्षद बर्डे व त्याच्या परीवाराच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर





