परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाबाबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाच्या अनुषंगाने आज मुंबई येथे कॅबिनेट मंत्री श्री. आशिष दामले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस श्री. सचिन वाडे पाटील, श्री. निखिल लातूरकर, श्री. विश्वजीत देशपांडे आणि श्री. संजय सुपेकर उपस्थित होते.
बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, योजनांच्या अंमलबजावणीला गती देणे तसेच आवश्यक बाबींची पूर्तता करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
समाजातील युवक, उद्योजक, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या गरजू घटकांना महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांचा अधिक प्रभावीपणे लाभ मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा झाली.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे काम अधिक व्यापक, गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी आवश्यक सहकार्य व उपाययोजनांवर बैठकीत भर देण्यात आला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429





