‘फोन डेटा Leakage कॅम्प ’द्वारे टाकरखेड्यात नागरिकांच्या मोबाईल सुरक्षेची तपासणी
जळगाव : नागरिकांच्या मोबाईलमधील डेटा आणि वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी टाकरखेडा गावात ‘सायबर शिक्षित गाव’ उपक्रमांतर्गत विशेष फोन Data Leakage कॅम्प घेण्यात आला.
Quick Heal फौंडेशन , Pune आणि QHF सायबर वॉरियर्स क्लब , KBCNMU, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा ’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना सायबर गुन्हे, डिजिटल सुरक्षा, मोबाईलचा सुरक्षित वापर आणि डिजिटल आर्थिक व्यवहार करताना आवश्यक काळजी याबाबत शिक्षित करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत Pre-Survey घेण्यात आला. Cyber Warriors आणि स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या मोबाईल वापराबाबत माहिती घेतली. मोबाईलमधील सुरक्षा सेटिंग्ज, वापराच्या पद्धती आणि डिजिटल सुरक्षेशी संबंधित आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला.
यानंतर 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत दुसऱ्या भेटीत Phone Data Leakage Camp घेण्यात आला. नागरिकांच्या मोबाईलची प्रत्यक्ष तपासणी करून डेटा आणि गोपनीयतेशी संबंधित सेटिंग्ज तपासण्यात आल्या. आवश्यक सुरक्षा सेटिंग्ज करून देण्यात आल्या. तसेच अनावश्यक डेटा शेअरिंग आणि संभाव्य गोपनीयता जोखीम कमी करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात 20 Cyber Warriors आणि School of Computer Science मधील इच्छुक स्वयंसेवक सहभागी झाले. शिक्षक समन्वयक राजू आमले सर तसेच टाकरखेडा गावचे सरपंच श्री. प्रवीण पाटील उपस्थित होते.
Pre-Surveyमधून नागरिकांच्या डिजिटल वापराचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष मोबाईल तपासणी, सुरक्षा सेटिंग्ज आणि मार्गदर्शन करण्यापर्यंतचा हा उपक्रम दोन टप्प्यांत राबविण्यात आला. नागरिकांमध्ये मोबाईल सुरक्षा आणि डिजिटल गोपनीयतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





