मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण
मुंबई : खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या वेळी खासदार ॲड. उज्ज्वल निकम, चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण, निर्माते दिनेश विजन, अभिनेते राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘प्रहार’ हा चित्रपट ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित असून, त्यांच्या सार्वजनिक आणि कायदेविषयक कारकिर्दीतील महत्त्वाच्या पैलूंवर चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 54





