टाकळीभान कोबंडवाडी अंगणवाडीत नवचेतना व आधाराशना कार्यक्रम उत्साहात
बालकांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन; अर्धवार्षिक वाढदिवस, दहीहंडी व विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत

टाकळीभान | प्रतिनिधी :टाकळीभान येथील कोबंडवाडी अंगणवाडी केंद्र क्रमांक २४५२२२३०५२८ येथे ‘नवचेतना व आधाराशना’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बालकांच्या सर्वांगीण विकासासह अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी (B.D.O.) स्मिता निकाळजे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) शोभा शिंदे गडम, बालसंगोपन अधिकारी शिसे मॅडम, पर्यवेक्षिका कल्पना फास्टे, तसेच माजी पर्यवेक्षिका खेडकर मॅडम यांची उपस्थिती होती,
कार्यक्रमादरम्यान अंगणवाडीतील बालकांचे अर्धवार्षिक वाढदिवस साजरे करण्यात आले. तसेच बालकांसाठी दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांमुळे चिमुकल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी अंगणवाडी सेविका शिंदे मॅडम व कासट्टी मॅडम यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये मानसिक विकास, भाषिक विकास, शारीरिक/कारक विकास, सामाजिक विकास आणि सृजनशीलता विकास या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांच्या आरोग्याबरोबरच स्वच्छतेचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. ओला कचरा व सुका कचरा यांची योग्य विल्हेवाट कशी लावावी, कचऱ्याचे वर्गीकरण का आवश्यक आहे, याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. बालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण लाभले.
यानंतर गरोदर मातांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी गरोदर मातांना शुभेच्छा देत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून बालकांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, भाषिक आणि सृजनशील विकास घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी याशिवाय टाकळीभान गटातील मंगल जाधव, अर्चना मावळे, संगीता जोशी, कल्पना कोकणे, छाया लांडगे, रेखा कणसे, अरुणा पाबळे, सुनिता शिरसाट, अनिता लोखंडे, रेखा माने, कविता कांबळे, तिलोतमा शिंदे, पूजा गांगोडे, मंदा शिंदे, शीला चांडे, छाया चांडे, महिला वअंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर





