महाराष्ट्राच्या हवाई वाहतुकीला नवी चालना; सोलापूर-मुंबई, अमरावती-पुणे मार्गांची निवड


महाराष्ट्राच्या हवाई वाहतुकीला नवी चालना; सोलापूर-मुंबई, अमरावती-पुणे मार्गांची निवड

‘उडान’ योजनेंतर्गत सोलापूर-मुंबई आणि अमरावती-पुणे हवाई मार्गांची निवड
मुंबई : महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित ‘उडान’ (UDAN) योजनेंतर्गत सोलापूर-मुंबई-सोलापूर आणि अमरावती-पुणे-अमरावती या दोन हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लहान शहरे प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांशी जोडली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘उडान’ योजनेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांसाठी हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करणे हा आहे. नव्या हवाई मार्गांमुळे सोलापूरमधील व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना मुंबईशी संपर्क साधणे सोपे होण्याची अपेक्षा आहे. तर अमरावती-पुणे हवाई सेवेमुळे विदर्भातील विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांना पुण्यातील शिक्षण, उद्योग आणि रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होऊ शकते.
या निर्णयामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच व्यापार, पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानले.
दरम्यान, या हवाई मार्गांची निवड झाली असली, तरी प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्याची तारीख आणि उड्डाणांचे वेळापत्रक अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी मो. ९८२२५४८४२९


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!