२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना पैठणमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली!


२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना पैठणमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली!
पैठण प्रतिनिधी |
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना पैठण येथे दीपप्रज्वलन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला अभिवादन केले.
या श्रद्धांजली कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, नरेंद्र अंधारे, पाटेकर साहेब, नानक वेदी, रामचंद्र आहुजा, विष्णू ढवळे, राजन सातघरे, ॲड. संदीप शिंदे, शेख रईस, योगेश धर्माधिकारी, विजय चाटुपळे, सतीश आहेर, मदन आव्हाड, ईश्वर मोरे, समीर शुक्ल, जगन्नाथ जमादार, कुणाल पिंपळे, रफिक कादरी, रामकृष्ण जमादार, शिवाजी तुपे, मन्सूर शेख, अमोल धस, बाळू कुलकर्णी, बबन सवने, जगदीश आचार्य, लक्ष्मण चौरे, शाम देव, रणजीत करकोटक यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते

. योगेश धर्माधिकारी लोक 1 न्यूज पैठण प्रतिनिधी


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!