त्रिमूर्ती विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा..


त्रिमूर्ती विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

टाकळीभान प्रतिनिधी : त्रिमूर्ती
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी सामूहिक असेंबलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. अमोल बहिरट व सवई यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.
यानंतर डी. के. एच. पी. यांनी
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये, लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या विषयांवर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे सादर केली. श्रीमती गारुळे यांनी ज्युनिअर विभागातील विद्यार्थ्यांची, तर माध्यमिक विभागातून तांबे यांनी
विद्यार्थ्यांची भाषणासाठी तयारी करून घेतली.
दुपारच्या सत्रामध्ये नागोराव लाहोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त चित्रकला
व पोस्टर निर्मिती स्पर्धे चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर आकर्षक पोस्टर्स तयार करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संतोष जावळे, संदीप काळे मनेष वेताळ, विकास कौटे, रेखा दिवे, अमोल बहिरट, सवई डीके. एच. पी. ललिता गारुळे, मयुरी राऊत, अमोल तांबे, आबासाहेब जाधव, निलेश कचेरिया, वनिता नाणेकर, अनिल पटारे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे, श्रीरामपूर


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!