,शिवाजी राजेंच्या काळातील चौरंगाची शिक्षा..’; नसरापूर प्रकरणी रितेश देशमुखने व्यक्त केला संताप
पुणे: पुण्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या अघोरी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेवर आता अभिनेता रितेश देशमुख याने तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर रितेशने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ‘चौरंगा’ करण्याच्या ऐतिहासिक शिक्षेचा संदर्भ दिला. तो म्हणाला की, आजचा काळ आणि कायदे वेगळे असले तरी, अशा नराधमाला कठोरतच कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
यावेळी रितेशने न्यायव्यवस्थेकडून या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजात मोठी लाट उसळली असून, सेलिब्रिटींनीही आता या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






