​अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी


​अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

​करमाळा: सोलापूर जिल्हयातील करमाळा तालुक्यात एक भीषण रस्ते अपघात घडला आहे. जातेगावजवळ कार आणि हायवा ट्रक यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत ५ महिन्यांच्या अनन्या दुमसे या चिमुरडीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर ५ सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील दुमसे कुटुंब कारने अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. जातेगाव परिसरात त्यांच्या कारला हायवा ट्रकने भीषण धडक दिली. या धडकेत कारचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
​अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या करमाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!