पंढरपुरात विठ्ठल मंदिरात राडा; भाजप कार्यकर्त्यांची व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की
पंढरपूर: मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे सध्या पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशातच, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी गेटवरून प्रवेश देण्यात आला. मात्र, त्यांच्यासोबत थेट दर्शनासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गेटवर मोठी गर्दी केली.
यावेळी व्हीआयपी प्रवेशावरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि ढकलाढकली झाल्याचे पाहायला मिळाले. भर उन्हात सामान्य भाविक तासनतास रांगेत उभे असताना, राजकीय नेत्यांच्या या ‘व्हीआयपी संस्कृती’मुळे आणि गेटवर झालेल्या गोंधळामुळे उपस्थित भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांनी या प्रकाराचा निषेध केला असून प्रशासनाने अशा घटनांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









