​सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीला उपरोधिक उत्तर; महाराष्ट्रातील तरुणाने स्थापन केली ‘कॉकरोच जनता पार्टी’


​सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीला उपरोधिक उत्तर; महाराष्ट्रातील तरुणाने स्थापन केली ‘कॉकरोच जनता पार्टी’

​सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केल्याच्या कथित टिप्पणीनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील अभिजीत दीपके या तरुणाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) नावाचा एक उपहासात्मक राजकीय पक्ष स्थापन केला आहे.
​या अनोख्या पक्षाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अवघ्या काही तासांतच इन्स्टाग्रामवर ५० लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून तरुणांनी व्यक्त केलेला हा एक डिजिटल संताप मानला जात आहे.
​पक्षात प्रवेशासाठी अटी:
अभिजीत दीपके यांनी या पक्षात सामील होण्यासाठी काही विशेष अटी जाहीर केल्या आहेत:
​उमेदवार बेरोजगार असावा.
​तो सतत ऑनलाईन असावा.
​योग्य मार्गाने आपला संताप व्यक्त करण्याची क्षमता त्याच्यात असावी.
​न्यायव्यवस्थेकडून आलेल्या टिप्पणीला अशा प्रकारे उपरोधिक उत्तर देऊन तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला गेला आहे.

​पत्रकार -उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!