ऑनलाइन औषध विक्रीविरोधातील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; केमिस्ट बांधवांची भूमिका स्पष्ट


ऑनलाइन औषध विक्रीविरोधातील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; केमिस्ट बांधवांची भूमिका स्पष्ट

पिंपरी-चिंचवड :अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने बुधवार, दि. २० मे रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी केमिस्ट बंदला पिंपरी-चिंचवड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर चैतन्य फार्मा ग्रुपचे मेडिकल मालक मधुकर बहिरू बच्चे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
बच्चे म्हणाले की, “सध्या ऑनलाइन औषध विक्री अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असून अनेक ठिकाणी कोणतेही नियम न पाळता गर्भपाताची औषधे, नशेची औषधे आणि इतर औषधांची विक्री केली जात आहे. हे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तसेच ग्राहकांना मोठ्या सवलतींचे आमिष दाखवून डुप्लिकेट औषधांची विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.”
ते पुढे म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना डुप्लिकेट आणि अस्सल औषधांमधील फरक ओळखणे कठीण जाते. त्यामुळे ग्राहक आर्थिक फायद्याच्या मोहात फसवले जात आहेत. केमिस्ट बांधव नेहमीच नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यामुळे औषध विक्री ही अधिकृत आणि प्रशिक्षित केमिस्टमार्फतच झाली पाहिजे.”
पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास २५०० हून अधिक केमिस्ट बांधवांनी या बंदमध्ये सहभाग घेतला असून शहरात १०० टक्के बंद पाळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार -उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!