पुणे पोलीस दलातील अमर कदम यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती
पुणे : महाराष्ट्र पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश नुकतेच जाहीर करण्यात आले असून, पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेले अमर कदम यांची पोलीस निरीक्षक (PI) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून दिनांक १९ मे २०२६ रोजी राज्यातील ७७ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये अमर कदम यांच्या नावाचा समावेश असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सहायक पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे.
अमर कदम हे सध्या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असून, त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध कामकाजामुळे आणि उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना ही पदोन्नती मिळाल्याचे बोलले जात आहे.
या पदोन्नतीनंतर पोलीस विभागासह मित्रपरिवार, सहकारी अधिकारी व विविध स्तरातून अमर कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार – उमेश कुलकर्णी
9822548429








