पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी; शिवसेना उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांचा इशारा
पिंपरी-चिंचवड : Shrirang Barne यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा देत पदाचा व पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करत थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाची प्रतिमा मलीन होईल किंवा जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. काही जण वैयक्तिक स्वार्थासाठी पदाचा अथवा लेटरहेडचा वापर करत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने हा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जनतेची कामे प्रामाणिकपणे करावीत, पक्षाच्या शिस्तीचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारे पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.
पत्रकार: ♦ शाम शिरसाठ पुणे











