संत तुकोबांच्या वारीचे वेळापत्रक जाहीर; ७ जुलैला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान


संत तुकोबांच्या वारीचे वेळापत्रक जाहीर; ७ जुलैला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान

देहू : प्रतिनिधी
आषाढी वारी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जेष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार दि. ७ जुलै २०२६ रोजी देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
यंदाच्या वारी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. उमेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण मोरे यांची सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. पालखी रथ व चौघडा गाडीसाठी संस्थानाने तीन बैलजोड्यांची खरेदी केली असून वारीच्या तयारीला वेग आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रासह देशभरातून लाखो वारकरी वारीत सहभागी होणार असून देहूनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी |


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!