​हिंजवडीत ७०० आयटी अभियंत्यांची फसवणूक; ‘थिंक टेक’ कंपनीच्या मालकाला अखेर अटक


​हिंजवडीत ७०० आयटी अभियंत्यांची फसवणूक; ‘थिंक टेक’ कंपनीच्या मालकाला अखेर अटक

​पिंपरी-चिंचवड:आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक मोठी आणि धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे. तब्बल ७०० आयटी अभियंत्यांना (IT Engineers) लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘थिंक टेक’ कंपनीच्या मालकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने ‘थिंक टेक’ नावाच्या आयटी कंपनीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीचे तसेच विविध आमिषे दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीचे बळी ठरलेल्या आयटी अभियंत्यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.
​अभियंत्यांच्या तक्रारीची दखल घेत हिंजवडी पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या कंपनीने आणखी किती जणांना अशा प्रकारे फसवले आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा सखोल तपास पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत. या मोठ्या कारवाईमुळे आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!