नीट पेपरफुटीवरून दिल्लीत ‘कॉक्रोच पार्टी’चे आंदोलन; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली: नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील तरुणांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, या विरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे एका आगळ्यावेगळ्या ‘कॉक्रोच पार्टी’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात तरुणांनी मोठ्या संख्येने एकत्र येत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, या आंदोलनात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनीही सहभाग नोंदवून तरुणांच्या सुरात सूर मिसळला आहे. जंतरमंतरवर जमा झालेल्या तरुण आंदोलकांनी पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ पद सोडावे, अशी मागणी लावून धरली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास पुढील आठवड्यात शनिवारी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे नीट परीक्षा गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर तापला आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी,९८२२५४८४२९










