पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने तरुणांची कथित फसवणूक; रेडियंट आयटी सर्व्हिसेसच्या दोन संचालकांना अटक


पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने तरुणांची कथित फसवणूक; रेडियंट आयटी सर्व्हिसेसच्या दोन संचालकांना अटक

पुणे :पुण्यातील खराडी परिसरात नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी रेडियंट आयटी सर्व्हिसेस या कंपनीच्या दोन संचालकांना अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने देशभरातील नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना मोठ्या पगाराच्या आयटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. त्यासाठी उमेदवारांकडून विविध शुल्क आणि रकमा स्वीकारण्यात आल्या. मात्र, पैसे घेतल्यानंतर अनेकांना आश्वासित नोकऱ्या मिळाल्या नसल्याची तसेच रक्कम परत करण्यात आली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी खराडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून कंपनीच्या दोन संचालकांना अटक केली. प्राथमिक तपासात लाखो रुपयांच्या व्यवहारांची माहिती समोर आली असून फसवणुकीची व्याप्ती अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणातील अनेक तक्रारदार हे ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबांतील सुशिक्षित युवक असल्याचे सांगितले जात आहे. नोकरीच्या आशेने जमा केलेली मोठी रक्कम गमावल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.
खराडी पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी पीडित अथवा संबंधित व्यक्ती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!