पुण्यात मुसळधार तर साताऱ्यात दमदार हजेरी, रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग
दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पुणे, मुंबई आणि साताऱ्यासह कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यात आज दुपारी हडपसर, कोथरूड भागात मुसळधार पाऊस झाल्याने उकाड्यापासून सुटका झाली, तर पहिल्याच पावसात स्वारगेट भागात पाणी साचले. साताऱ्यातील परळी खोऱ्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. २५ जूननंतर राज्यात मान्सून आणखी जोर धरणार आहे
पत्रकार उमेश कुलकर्णी
Views: 32







