लोणावळा चिक्कीला अखेर GI टॅग; शतकभराच्या गोड परंपरेला जागतिक मान्यता


लोणावळा चिक्कीला अखेर GI टॅग; शतकभराच्या गोड परंपरेला जागतिक मान्यता

पुणे :
पर्यटकांच्या आवडीची आणि महाराष्ट्राची खास ओळख असलेल्या लोणावळा चिक्कीला अखेर भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त झाले आहे. शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या या उत्पादनाला मिळालेल्या या मानांकनामुळे त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख अधिक बळकट झाली आहे.
ब्रिटिश काळात मुंबई–पुणे रेल्वे घाटाच्या बांधकामादरम्यान काम करणाऱ्या मजुरांना ऊर्जा मिळावी म्हणून गूळ आणि शेंगदाण्यांपासून तयार करण्यात आलेली चिक्की पुढे लोणावळ्याची खासियत बनली. कालांतराने तिची चव आणि गुणवत्ता यामुळे देश-विदेशातील पर्यटकांमध्ये ती लोकप्रिय झाली.
GI टॅगमुळे लोणावळा चिक्कीला कायदेशीर संरक्षण मिळणार असून बनावट उत्पादनांवर आळा बसण्यास मदत होईल. तसेच निर्यातीला चालना मिळून स्थानिक उत्पादक, उद्योजक आणि व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या मानांकनामुळे लोणावळा चिक्कीच्या परंपरेला आणि अस्सल गुणवत्तेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत आणखी एका मानाच्या पानाची भर पडली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548129


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!