धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; चालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने ४९ प्रवासी सुखरूप


धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; चालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने ४९ प्रवासी सुखरूप

धुळे : धुळ्यातील नगाव बारी परिसरात नंदुरबार आगाराच्या नंदुरबार-धुळे शिवशाही बसला धावत असतानाच अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखून तातडीने बस थांबवली आणि सर्व ४९ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण शिवशाही बस आगीत जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. चालक व वाहक यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याने त्यांच्या प्रसंगावधानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
– प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!