अण्णा हजारे यांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; उद्या अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलन


अण्णा हजारे यांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; उद्या अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलन

अहिल्यानगर : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच सरकारने विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, २४ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमधील गांधी स्मारकात अण्णा हजारे मौन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात ‘नगरचे जंतर मंतर’ असे नाव देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत, शांततापूर्ण मार्गाने हा प्रश्न सोडवावा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
– प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!