बिहार पोटनिवडणुकीत जनसुराजचा मोठा विजय; भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला


बिहार पोटनिवडणुकीत जनसुराजचा मोठा विजय; भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला

पटना : बिहारमधील बाँकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भाजपचा तब्बल ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपचे नेते नितीन नवीन यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आमदारपदाचा राजीनामा दिल्याने बाँकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.
मतमोजणीत प्रशांत किशोर यांनी सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. या निकालामुळे बिहारच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.
या पराभवामुळे भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात असून, जनसुराज पक्षासाठी हा विजय मोठे यश मानला जात आहे. दरम्यान, या निकालानंतर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!