पुण्यात डीजेवर नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या; ५ अल्पवयीनांसह १० जण ताब्यात


पुण्यात डीजेवर नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या; ५ अल्पवयीनांसह १० जण ताब्यात

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवादरम्यान डीजेवर नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवादरम्यान डीजेवर नाचण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे हाणामारीत परिवर्तित झाला. त्यानंतर १० ते १५ जणांच्या टोळक्याने शुभम घोडके (वय २२) याच्यावर लाठ्या-काठ्यांनी व धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांसह एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून हत्येमागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!