ठाणे : हॉटेलमध्ये चॉपर घेऊन घुसलेल्या आरोपीची तोडफोड; जीवे मारण्याची धमकी


ठाणे : हॉटेलमध्ये चॉपर घेऊन घुसलेल्या आरोपीची तोडफोड; जीवे मारण्याची धमकी

ठाणे | ४ ऑगस्ट २०२६

ठाणे रेल्वे स्थानक रोडवरील कॅनन हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. तक्रारीनुसार, ₹२,००० देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीचा हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर आरोपी धारदार चॉपर घेऊन हॉटेलमध्ये घुसला, शिवीगाळ केली आणि हॉटेल व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी दिली.

तक्रारीनुसार, आरोपीने धमकी देताना, “रिंकू कुठे आहे? त्याला कापून टाकतो, आज त्याचा कायमचा बंदोबस्त करतो,” असे म्हटले.

यानंतर आरोपीने हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेत काचा, फर्निचर आणि इतर साहित्याचे नुकसान झाले असून, हॉटेलचे सुमारे ₹१.२५ लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये उपस्थित ग्राहक आणि कर्मचारी प्रचंड घाबरले असून, जीव वाचवण्यासाठी त्यांनी हॉटेलबाहेर धाव घेतली. तोडफोडीदरम्यान फुटलेल्या काचा खाली पडल्याने कर्मचारी आणि ग्राहकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. त्या वेळी एखादा व्यक्ती काचांच्या तावडीत सापडला असता, गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होण्याची शक्यता होती.

या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली दिलीप आहिरे करत आहेत.

रेल्वे स्थानकासारख्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात भरदिवसा चॉपर घेऊन हॉटेलमध्ये घुसून धमकी देणे आणि तोडफोड करण्याच्या या घटनेमुळे स्थानिक सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!