नांदेडमध्ये क्रिकेटच्या वादातून वर्गमित्रावर चाकूने हल्ला; १०वीच्या विद्यार्थ्याकडून धक्कादायक कृत्य


नांदेडमध्ये क्रिकेटच्या वादातून वर्गमित्रावर चाकूने हल्ला; १०वीच्या विद्यार्थ्याकडून धक्कादायक कृत्य

नांदेड :शाळेत क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाचे रूप गंभीर हिंसाचारात बदलल्याची धक्कादायक घटना नांदेडमधील असर्जन येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात घडली आहे. १०वीच्या एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपी विद्यार्थ्याने बाजारातून चाकू खरेदी करून तो शाळेच्या दप्तरात लपवून ठेवला.
त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी मधल्या सुट्टीत गणपती मंदिराजवळ संधी साधत त्याने वर्गमित्राच्या गळ्यावर, पोटावर आणि हातावर चाकूने वार केले. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!