पुण्यात नणंद-भावजयीच्या वादातून ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेवीक्विक; लोहगावमधील संतापजनक घटना


पुण्यात नणंद-भावजयीच्या वादातून ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेवीक्विक; लोहगावमधील संतापजनक घटना

पुणे :कौटुंबिक वादाचे रूप क्रूरतेत बदलल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव परिसरात घडली आहे. नणंद-भावजयीमधील वादातून अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेवीक्विक ओतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी कौटुंबिक कारणावरून नणंद आणि भावजयीमध्ये वाद झाला होता. या वादाच्या रागातून आरोपी महिलेने झोपलेल्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेवीक्विक ओतल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!