खासगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावल्यास कडक कारवाई; राज्यभरातील पोलिसांना वाहतूक विभागाचे आदेश


खासगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावल्यास कडक कारवाई; राज्यभरातील पोलिसांना वाहतूक विभागाचे आदेश

मुंबई :खासगी वाहनांवर अनधिकृतपणे ‘पोलीस’ अशी पाटी किंवा स्टिकर लावणाऱ्यांविरोधात राज्यभरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी लावल्यामुळे अनेकदा अशा वाहनांची तपासणी टाळली जाते. या प्रकाराचा गैरफायदा घेत काहीजण बेकायदेशीर कामांसाठी अशा वाहनांचा वापर करत असल्याच्या तक्रारीनंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृतपणे ‘पोलीस’ पाटी, स्टिकर किंवा तत्सम ओळखचिन्ह लावून फिरणाऱ्या खासगी वाहनांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि खासगी वाहनांवर कोणतीही अनधिकृत शासकीय ओळख दर्शविणारी पाटी न लावण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!