ठाण्यात २१व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या; मृत महिलेची ओळख कुमुदा शेट्टी अशी पटली


ठाण्यात २१व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या; मृत महिलेची ओळख कुमुदा शेट्टी अशी पटली

ठाणे : वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्युपिटर हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या सवाना, वसंत लॉन्स येथील २१व्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेची ओळख कुमुदा शेट्टी अशी पटली आहे.
घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
काही माध्यमांमध्ये कुमुदा शेट्टी या टाटा समूहातील वरिष्ठ उपाध्यक्ष (Senior Vice President) असल्याचे सांगितले जाणारे प्रशांत शेट्टी यांच्या आई असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या नातेसंबंधाबाबत अद्याप पोलिसांकडून किंवा संबंधित कुटुंबाकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही.
वर्तक नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अधिकृत माहिती आणि पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!