राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची निवड
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच तथा आयटी इंजिनिअर निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कारेगावच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात निर्मला नवले यांनी कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावत अभ्यासू, कार्यक्षम आणि धडाडीच्या लोकप्रतिनिधी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना निर्मला नवले यांनी राज्यातील तरुणींच्या समस्या प्रभावीपणे मांडून युवती आघाडीचे संघटन राज्यभर अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच पक्षाची विचारधारा तळागाळातील युवतींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक स्तरावर काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
— प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी





