मिसिंग लिंकच्या बोगद्यात फॉर्च्युनरचा टेम्पोला भीषण धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर.


मिसिंग लिंकच्या बोगद्यात फॉर्च्युनरचा टेम्पोला भीषण धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; बोगदा दोन तास बंद, वाहतूक जुन्या मार्गावर वळवली

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या बोगद्यात फॉर्च्युनर कारने मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात फॉर्च्युनरमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कारमधील अन्य तीन जण सुदैवाने बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त फॉर्च्युनर कारमधील प्रवासी पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असून ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. मिसिंग लिंकच्या बोगद्यातून जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनर कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अपघातानंतर कार आणि टेम्पो बोगद्यात दोन्ही बाजूंना पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम करण्यात आले. या घटनेनंतर मिसिंग लिंकचा बोगदा सुमारे दोन तास पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली.

अपघातामुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतुकीवर परिणाम झाला. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!