मनीषभैया श्रीवास्तव यांना मातृशोक
पारध प्रतिनिधी –महेंद्र बेराड:- शिवसेना ठाकरे गटाचे जालना जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव तसेच पारधचे उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांच्या मातोश्री श्रीमती रजनीदेवी राजेंद्रजी श्रीवास्तव यांचे शुक्रवारी (दि. ७) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने श्रीवास्तव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता पारध बु.येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
Views: 107




