श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जलगांव ग्रामीण संघटकपदी सुनिल बाबूराव राजपूत यांची नियुक्ती!.


श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जलगांव ग्रामीण संघटकपदी सुनिल बाबूराव राजपूत यांची नियुक्ती!..

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जलगांव ग्रामीण संघटकपदी सुनिल बाबूराव राजपूत यांची नुकतीच अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीनंतर त्यांनी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे जाहीर आभार मानले आहेत.
अमरशहीद ठा. सुखदेवसिंहजी गोगामेडी यांच्या प्रेरणेने आणि विचारांनी संपूर्ण भारतात कार्यरत असलेल्या या संघटनेत मोठी जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सुनिल राजपूत यांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. ॲड. शिला सुखदेवसिंहजी गोगामेडी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणसिंहजी दादा पाटील, प्रदेश संघटक मा. विलास नाना पाटील आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. दामोदर भाऊ राजपूत यांचे विशेष आभार मानले.
तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष मा. विठ्ठलसिंग भाऊ मोरे व जिल्हा कार्यकारिणीचे आभार मानताना त्यांनी सांगितले की, “या मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने करेल. वरिष्ठ नेत्यांनी आणि सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही तुटू देणार नाही.” या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात करणी सेनेचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!