बुलढाणा जिल्ह्याच्या नामकरणाची मागणी; ‘राजमाता जिजाऊनगर’ नाव देण्याची आमदार श्वेता महाले यांची मागणी
बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ असे करण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असून या भूमीला ‘मातृतीर्थ’ म्हणून विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. राजमाता जिजाऊंच्या कार्याचा आणि त्यांच्या जन्मभूमीचा गौरव व्हावा, या उद्देशाने जिल्ह्याचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत प्रशासनाला पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429
Views: 62




