शिवसेना संघटना बळकटीसाठी पदाधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी; नवनियुक्त संपर्क प्रमुखांचा सत्कार पिंपरी-चिंचवड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)


शिवसेना संघटना बळकटीसाठी पदाधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी; नवनियुक्त संपर्क प्रमुखांचा सत्कार

पिंपरी-चिंचवड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने नवनियुक्त संपर्क नेते व भोसरी विधानसभा संपर्क प्रमुख सुनील सावंत तसेच पिंपरी-चिंचवड विधानसभा संपर्क प्रमुख विजय मूळे यांचा शहराच्या वतीने चेतन पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बी.एल.ए. (बूथ लेव्हल एजंट) संदर्भातील कामकाज तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध संघटनात्मक उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने सक्रियपणे काम करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास दत्ता साळवी, अशोक वाळके, कैलास नेवासकर, दिलीप सावंत, सोमी सिंधू, अनिता तुतारे, बाबा भोंडवे, मोहन बारटक्के, योगेश ठाकरे, जितेंद्र गोसावी, सुधीर शेळके, शिवाजी शेळके यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, शिवदूत व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन, आकुर्डी येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवीन पदाधिकारी, बी.एल.ए. नियुक्ती तसेच पक्ष संघटना वाढीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, शिवदूत व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांनी केले होते.
विजय अडसूळ प्रतिनिधी


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!