सांगलीत स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; चिमुकलीचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी


सांगलीत स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; चिमुकलीचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

शिराळा, सांगली : शिराळा तालुक्यातील आटूगडेवाडी परिसरात स्कूल व्हॅनचा भीषण अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने व्हॅन पुलाच्या कठड्यावर आदळली.
या दुर्घटनेत एका ६ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!