पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ३ दिवस दर्शन बंद
पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २३ ते २५ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या जतन व संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून विशेष लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामासाठी मंदिरातील नियमित दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत पदस्पर्श दर्शन तसेच मुखदर्शन या दोन्ही सुविधा बंद राहतील. त्यामुळे भाविकांनी २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान दर्शनासाठी पंढरपूरला येण्यापूर्वी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 39







