चंद्रपुरात विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; १२.६० लाखांचा मुद्देमाल जप्त


चंद्रपुरात विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; १२.६० लाखांचा मुद्देमाल जप्त


चंद्रपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘नो डीजे, नो डॉल्बी’ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चंद्रपूर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. राजुरा येथे विनापरवाना डीजे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी बोलेरो पिकअपसह तब्बल १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक शांतता आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. नियम मोडल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही आणि यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!