मैदानी खेळामुळे शरीर प्रकृती चांगली व सुदृढ राहते… अर्जुन राऊत …


मैदानी खेळामुळे शरीर प्रकृती चांगली व सुदृढ राहते… अर्जुन राऊत

(साई चॅलेंजर फुटबॉल क्लब टाकळीभानचा वर्धापन दिन उत्साहात साजरा )

टाकळीभान: मैदानी खेळामुळे शरीर प्रकृती चांगली, निरोगी व सदृढ राहत असून पालकांनी आपल्या मुलांना किमान रोज दीड दोन तास मैदानी खेळांसाठी द्यावा असे प्रतिपादन पत्रकार अर्जुन राऊत यांनी केले. टाकळीभान येथील साई चॅलेंजर फुटबॉल क्लब ग्रुपचा वर्धापन दिन ग्रामीण माध्यमिक विद्यालय मैदान येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी उद्घाटनास अतिथी म्हणून पत्रकार राऊत बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कबड्डी खेळाडू भैय्या पठाण, पत्रकार अर्जुन राऊत, विजय भगत सर यांच्या हस्ते ग्राउंडचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलताना अर्जुन राऊत म्हणाले की फुटबॉल हा जागतिक लोकप्रिय खेळ असून या खेळाला आपल्या देशामध्ये मोठा वाव असून या खेळामध्ये खेळाडूंना करिअरच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे या फुटबॉल खेळा संदर्भातला सराव व सामने येथील खेळाडूंनी सुरू ठेवावेत. आजची तरुण पिढी मैदानी खेळ विसरली असून टाकळीभान सारख्या ग्रामीण भागामध्ये या फुटबॉल खेळाचे खेळाडू घडवण्याचं काम साई चॅलेंजर फुटबॉल क्लबच्या वतीने होत असून ही अतिशय अभिमानाची व गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी म्हटले. पालकांनीही मैदानी खेळांसाठी मुलांना वेळ देऊन प्रोत्साहित करावे असे आवाहनही यावेळी राऊत यांनी केले. याप्रसंगी सातत्याने फुटबॉल खेळाची प्रॅक्टिस करत असलेला उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू महेश जेजुरकर याचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी या ग्रुपच्या वतीने सर्व फुटबॉल खेळाडू, क्रीडा प्रेमी यांना भोजन देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी साई चॅलेंजर फुटबॉल क्लब ग्रुप मधील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी संदीप जावळे सर, अशोक दाभाडे, संतोष नाईक आदींसह मोठ्या संख्येने तरुण युवक खेळाडू उपस्थित होते.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!