गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला; दोघांचा मृत्यू, १२ जखमी


गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला; दोघांचा मृत्यू, १२ जखमी

छत्रपती संभाजीनगर : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट लावणारी भीषण दुर्घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावर घडली. पिंप्रीराजा फाट्याजवळ गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर शिरल्याने मोठा अपघात झाला.
या दुर्घटनेत विठ्ठल जाधव आणि रमेश बनसोडे या दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तब्बल १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या कारणांचा आणि कंटेनर चालकाच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.
गणपती आगमनाच्या आनंदाला या दुर्घटनेने काळा डाग लागला असून, मिरवणुकांच्या मार्गावरील वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!